दिग्गज नेत्यांनी मागितली होती माफी ; संजय राऊतांचा इशारा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर आसूड ओढला.

राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्र शिवरायांची बदनामी कधीही खपवून घेणार नाही. यापूर्वी पंडित नेहरुंनी छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. परंतु त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली. कारण ते मोठे नेते होते. मोरारजी देसाई यांनीही चुकीच्या विधानानंतर माफी मागितली होती. परंतु भाजपच्या आराध्य दैवतांकडून छत्रपतींचा अवमान होतोय आणि माफी मागितली जात नाही. आता महाराष्ट्र आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही… वेट अॅंड वॉच.. असा गर्भित इशारा संजय राऊतांनी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम