
अभिनेत्री ऐश्वर्या व दीपिकाचा पार्टीतील डान्सचा व्हिडीओ व्हायरल
दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ उत्तम डान्ससाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्यानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या डान्स फॉर्म केल्याचे आपण पाहिले आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच ऐश्वर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी तिच्या एका व्हिडीओत बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण दिसत आहे. त्या दोघांमध्ये असलेली बॉन्डिंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
हा व्हिडिओ ईशा अंबानीच्या लग्नाआधीच्या पार्टीचा आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेक, रणबीर-दीपिकाचे अनेक इनसाइड व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या व्हिडीओत पहिले अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते ‘दिल धडकने दो’ या चित्रपटातील ‘गल्ला गुडिया’ या गाण्यावर डान्स करत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या मग्न होऊ डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या दीपिकासोबत डान्स करताना दिसत आहे.या व्हिडीओत, ऐश्वर्या राय गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे, तर दीपिका पदुकोणनं लाल रंगाची साडीनेसली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे चाहते हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा प्ले करत आहेत आणि जबरदस्त लाईक आणि शेअर करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम