विद्यार्थिना पोलिसांबद्दल असलेली भिती काढत पोलिस स्टेशन च्या दैनंदिन कामकाजाचे दिले धडे
अमळनेर (आबिद शेख) अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये अमळनेर शहरातील ग्लोबल स्कूल चे ९ ते १० वीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि शिक्षक यांची महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) पोलीस स्टेशनला भेट आयोजित करुन त्याना पोलीस स्थापना दिनाचे (रेझिंग डे) चे महत्व समजावुन सांगण्यात आले. तसेच पोलीस स्टेशनच्या दैनंदिनी कामकाजाची विभाग नुसार प्राथमिक स्वरुपाची माहिती तसेच त्यांना शस्त्रगार मधील शस्त्रांची माहिती देखील देण्यात आली. सदर वेळी प्रत्येकी शाळेचे १२० ते १३० विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होत्या. सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पोलीसांबदल असलेली भिती मनातून काढून त्यांना पोलीस खात्याचे कामकाज समजावून सांगितले. तसेच सध्या स्थितीत सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये. काही अडचण अगर माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आम्हास कळवावे. बाबत योग्य मार्गदर्शन केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम