बालकाचे प्राण वाचविणाऱ्या पोहेकॉ विलेश सोनवणे यांचा सत्कार

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | २८ ऑक्टोबर २०२२ | चोपडा बसस्थानकात गुरुवार दि२६ ऑक्टोबर रोजी एक बस चालक आपली बस मागे घेत असतांनाच एक ५ वर्षीय बालक बसच्या चाकाखाली येत असल्याचे लक्षात येताच तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता तत्परतेने बालकाला अलगद चाकाखाली येण्याअगोदर अलगद उचलून त्याचा जीव वाचविणाऱ्या चोपडा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ/ ३१८० विलेश सोनवणे यांचा २७ रोजी एसटी महामंडळाचे सुरक्षा अधिकारी विजय जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विलेश सोनवणे यांच्या कामगिरीचे कौतुक उपस्थितांनी केले. पोलीस दलाची मान उंचावेल अशी कामगिरी केल्याचे गौरवोद्गार विजय जाधव यांनी काढले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम