Virat Kohli Rest: विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-२० खेळणार नाही; आता थेट टी-२० वर्ल्ड कपमध्ये दिसणार!
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेवर कब्जा केला आहे. दरम्यान, इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. म्हणजेच विराट कोहली आता थेट टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे.
दै. बातमीदार । ०३ ऑक्टोबर २०२२ । भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची मालिका आहे, ज्याचा शेवटचा सामना ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजेच आता २३ ऑक्टोबरला चाहत्यांना विराट कोहली, केएल राहुल थेट पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाहायला मिळतील.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि केएल राहुलच्या विश्रांतीनंतर श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच तिसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये बदल पाहायला मिळतो. उभय संघांमधील मालिकेतील शेवटचा टी-२० सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे, हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. टीम इंडियाने मालिका जिंकली आहे भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी२०l मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या टी-२० मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारताने मालिका आधीच जिंकल्याने विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जर विराट कोहली तिसऱ्या टी-२० मध्ये खेळला नाही, तर तो आता फक्त टी-२० वर्ल्ड कपमध्येच दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. मात्र, त्याआधी टीम इंडियाला सराव सामनेही खेळायचे आहेत, जे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध असतील. विराट कोहलीने आशिया कपमध्ये पुनरागमन केले विराट कोहलीने आशिया कप दरम्यानच टीम इंडियात पुनरागमन केले. त्याआधी तो सुमारे ४० दिवसांच्या ब्रेकवर होता. टीम इंडिया ६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कपसाठी रवाना होणार आहे, त्यामुळे सर्व सीनियर खेळाडूंना थोडी विश्रांती देण्यात येत आहे. विराट कोहली तिसऱ्या टी२० मध्ये खेळणार नाही, त्यामुळे तो ६ ऑक्टोबरला संघासोबत रवाना होण्यास तयार आहे.
टी२० विश्वचषकापूर्वी विराट कोहली फॉर्ममध्ये आला असून तो सतत धावा करत आहे. त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला आणि टीम इंडियासाठी महत्त्वाच्या खेळाडूची भूमिका बजावत आहे. अशा परिस्थितीत आता विराट कोहली टी-२० विश्वचषकातही अप्रतिम दिसणार आहे, अशी आशा सर्वांना लागली आहे.
विराट कोहलीचे शेवटचे ६ डाव (टि२०)
४९* वि दक्षिण आफ्रिका
३ वि दक्षिण आफ्रिका
६३ वि ऑस्ट्रेलिया
११ वि ऑस्ट्रेलिया
२ विऑस्ट्रेलिया
१२२* वि अफगाणिस्तान
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम