जळगांव शहराच्या विकासासाठी अंबरनाथ ला भेट द्या; माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींचे आवाहन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ मार्च २०२३ ।  अंबरनाथ मधील सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक , आरोग्यविषयक , प्राथमिक सुविधा विषयी , कॉन्क्रीटचे रस्ते, करमणूक, कला क्रीड़ा , धार्मिक अशा सर्वांगीण विकासाकरीता अंबरनाथ शिंदे पॅटर्न हा सुप्रसिद्ध होत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.बालाजी किणीकर तसेच मला संधी दिल्यामुळे या विकास कामात आम्हाला सहभागी होऊन शहरात काम करण्याची संधी मार्गदर्शक एकनाथजी शिंदे देत आहेत.

जलगाँव महापालिकाचे नगरसेवक , आयुक्त , जी प मुख्याधिकारी तसेच सर्वपक्षीय गटनेते आणी पदाधिकारी यांना अंबरनाथ दौरा करणे बाबत आम्ही अंबरनाथ येथे मुख्यमंत्री महोदय आमदार असतांना अंबरनाथ शहराची जबाबदारी होती , त्यांनी सर्व शहरांमध्ये आर्थिक निधि नसताना कशी कामे करावी , कशा पद्धतीने शहराचा विकास करावा आर्थिक निधिच नियोजन कश्या पद्धतीने कराव याचे मार्गदर्शन घेत असताना , मला दोन वेळा नगराध्यक्ष बनवून माझे शहर विकास कामाकरीता मार्गदर्शन केल्या प्रमाणे त्याचबरोबर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने प्रयत्नाने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विज़न ने अंबरनाथ शहराचा विकास करणे कामी डॉ बालाजी किणीकर आणि अंबरनाथ शहरातील मुख्याधिकारी आणी सर्व आपल्या शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी , उपनगराध्यक्ष , सर्व पक्ष गटनेते यांच्या पुढाकाराने या शहराचा सर्वांगीण विकास होत आहे , बऱ्याच प्रमाणात झालेला आहे , जवळ जवळ 90% रस्ते कॉन्क्रीट चे झालेले आहेत हे करण्याची करत असताना माझ गांव जळगाव येथील आव्हाने असून मला माझ्या गावाबद्द्ल आणी जळगाव जिल्ह्याबद्द्ल प्रेम आहे , त्यासाठी हा माझा छोटासा प्रयन्त आहे. विधिमंडळ विधेयकात माझे नाव उल्लेखुन गौरव केला

शहराचा पण मोठ्या प्रमाणात विकास व्हावा याकरिता आम्ही मागे मुख्यमंत्री महोदय तिकडे आलेले असतांना माननीय राजु मामा भोळे साहेब , त्याचबरोबर स्वतः आपण आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि माननीय गिरीश भाऊ महाजन , आमदार श्री.चंद्रकांत पाटील , आमदार श्री.किशोर आप्पा पाटील , आमदार चिमणराव पाटील, आमदार लताताई सोनवणे , प्रतापराव गुलाबराव पाटील हे सर्व आणी आपण ऐका मीटिंग मध्ये गाडीत चर्चा करत असतांना आपण शहरासाठी रस्ते आणी इतर निधि करीता मागणी करीत होतात त्यावेळला ज्यांच्या त्यांच्या प्रमाणे माझेही असे मत होते की जळगाव शहरांमध्ये अनेक मंत्री होऊन गेले त्याचबरोबर 02 सभापति होऊन गेले इतकेच नव्हे तर इथे राष्ट्रपती सुद्धा जळगावच्या होऊन गेल्या एवढे मोठ मोठे लोकांनी पद भुषविलेले असतांना सुद्धा या शहराचा म्हणावा तसा विकास व् कामेही झालेली नाही , रस्त्यांची परिस्थिति बघता आता माननीय नामदार गुलाबरावजी पाटील आणी आपण यांच्या प्रयत्नाने येथे माननीय श्री.गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने काही कामे सुरु आहेत पण या रस्त्यांना हजार ते दोन हजार कोटी निधी हे शहर अतिशय सुंदर होऊ शकते , हे शहर सुवर्णनगरी असल्याने त्याचा विकास करावा , परवाच अंबरनाथ येथे मुख्यमंत्री साहेब आलेले असतांना आम्हाला साडे सातशे कोटि निधी दिला त्याचबरोबर व्यासपीठावर मी स्वतः मागणी केली की साहेब साडे सातशे कोटी निधी आपण अंबरनाथ मध्ये ओलिंपिक दर्जाच स्विमिंग पुल , नाट्यगृह मेडिकल कॉलेज , UPSC सेंटर , स्टेडियम त्याचबरोबर सॅटिस प्रकल्प असे सर्व विविधांगी आपण विकास करीत असताना खासदार साहेब यांच्या दूरदृष्टीने याकरिता अजून अंबरनाथ शहराकरीता अडीचशे कोटी निधीची मागणी केली आपण व्यासपीठावर त्याची मागणी चा विचार करण्यासाठी आदेश दिले .

आपणास ज्या दिवशी येण्यास सोयीस्कर होत असेल तेव्हा एक दिवस ठरवुन आपण येऊन अंबरनाथ शहराला भेट देऊन माहिती घेऊन आणी सुनियोजित शहर करण्याकरिता माझ तिकडच गांव असल्यामुळे माझी जबाबदारी माझा मुख्यमंत्री महोदय आणी खासदार साहेब यांच्याशी आम्ही हक्काने बोलू शकतो आणी विकास कामकारिता भांडूही शकतो एवढा हक्क त्यांनी आम्हाला दिलेला आहे , आपण भेट देऊन आपल्याशहराचा सकारात्मक विचार करण्यासाठी आपली टीम घेऊन यावी ही विनंती .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम