विवेकानंद प्रतिष्ठानच्या गाथा स्वातंत्र्याची : ‘कला’ महोत्सवाचा देशभक्तिमय वातावरणात समारोप

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जानेवारी २०२३ । ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर आधारित ‘गाथा स्वातंत्र्याची : साहित्य, संस्कृती आणि कला’ या चारदिवसीय महोत्सवाचा आज देशभक्तीमय वातावरणात समारोप करण्यात आला. आजच्या समारोपीय पुष्पात विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘गाथा स्वातंत्र्याची भाग ३’ या महानाट्याचे सादरीकरण केले. या पर्वात भारतीय स्वातंत्र्याचा १९९१ ते २०२२ या कालखंडातील गौरवपूर्ण क्षणांची मांडणी नृत्य, गीत, संगीत आणि कथेच्या स्वरूपात करण्यात आली. या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री मंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील, जळगांव शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी पाटील, विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. केदार पांडे, बळवंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रत्नाकर गोरे यांनी केले तर अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी पाटील, विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. केदार पांडे यांनी या महानाट्यात विद्यार्थी व शिक्षकांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले. महानाट्याची सुरवात आरंभ हे प्रचंड या गीताने करण्यात आली तर संपूर्ण महानाट्यात कृषी क्षेत्र, शिक्षण, पोखरण अणुऊर्जा उपक्रम, मंगळयान मोहीम, स्वच्छता मोहीमेवर आधारित स्वच्छ भारत अभियान, भारुड, महिला सबीकरण, संरक्षणक्षेत्रातील कामगिरी दर्शविणारे ऑपरेशन कारगिल, सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ला, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, चित्रपट, आत्मनिर्भर भारत, राममंदिर निर्माण अशा लक्षवेधी प्रसंगांना साकरण्यात आले या महानाट्य एकूण १२७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या प्रसंगी व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. शोभाताई पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे श्री.गोपाळ पलोड, विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासन प्रमुख श्री.दिनेश ठाकरे, मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.किरण सोहळे, समन्वयक श्री.गणेश लोखंडे, सौ.रत्नमाला पाटील, सौ.सविता कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुश्री मदाने आणि सुनीता तडवी यांनी तर आभार सविता कुलकर्णी यांनी केले.

तत्पूर्वी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाची संगाता आजच्या सत्रात करण्यात आली. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कुमार साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले तर ‘गाथा स्वातंत्र्याची’ या साहित्य, संस्कृती आणि कला महोत्सवाच्या पहिल्या पुष्पात ‘स्वतंत्रता साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले. या संमेलनास मुंबई येथील जेष्ठ बालसाहित्यिक आणि कथाकथनकार श्री.एकनाथ आव्हाड यांची ‘प्रतिभेच्या प्रातांतील प्रवास’ या विषयांवर विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तसेच या साहित्य संमेलनात एकूण ४५ बालकवी आपल्या कविता सादर करण्यात आले तर ११ गटांचे अभिवाचन आणि खान्देशातील अनामविरांच्या १६ कथा देखील सादर करण्यात आल्या तर सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर दुसऱ्या पुष्पात कला महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थी रांगोळी, चित्रकला, मॉडेल (प्रतिकृती) प्रदर्शनी, फोटो डॉक्युमेंटरी, आणि किल्ले तयार करणे अशा विविध स्पर्धांव्दारे देशाच्या सांस्कृतिक इतिहासाला कलेच्या माध्यमातून साकारले. सायंकाळच्या सत्रात ‘गाथा स्वातंत्र्याची भाग १ (कालखंड १४९८ ते १९४७) या भारताच्या गौरवपूर्ण इतिहास विविध रुपातून ब.गो.शानभाग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सादर केला. संमेलनाच्या तिस-या पुष्पात ‘गाथा स्वातंत्र्याची भाग २ (कालखंड १९४८ ते १९९०) चे सादरीकरण काशिनाथ पलोड विद्यालयाव्दारे करण्यात आले तर ‘गाथा स्वातंत्र्याची भाग ३ (कालखंड १९९१ ते २०२२) या चौथ्या पुष्पाचे सादरीकरण इंग्लिश मिडीयम शाळेच्या वतीने करण्यात आला. यात एकूण पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थी, पालक आणि जळगाव शहरातील गणमान्य व्यक्ती आणि नागरिकांच्या उपस्थितीत या दिमाखदार सोहळ्याचा समारोप करण्यात आला. विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात साहित्य, संस्कृती आणि कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असते. या महोत्सवाचे विद्यार्थी, शिक्षक आणि जळगाव शहरातील जनसामान्यानी देखील विशेष कौतुक केले तर शहरातील सुप्रसिद्ध वृत्तपत्र आणि समाज माध्यमांनी देखील याची दखल घेतली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम