वाडे बस सुरु, पञकार अशोक परदेशी यांचे उपोषण यशस्वी

बातमी शेअर करा...

भडगाव वार्ताहर — 

भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी या बंद बस फेर्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात.याबाबत वेळोवेळी  मागण्या करुनही पाचोरा व भडगाव बसस्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष झाल्याने भडगाव तहसिल कार्यालयासमोर भडगावचे पञकार अशोक परदेशी यांनी  ग्रामस्थांसह दि. ७ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजेपासुन आमरण उपोषण सुरु केले होते.  पाचोरा आगार प्रमुखांनी  आमरण  उपोषणाची व मागणीची तात्काळ  दखल घेतली.  पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी लेखी आश्वासन दिले. तसेच यावेळी निवाशी नायब तहसिलदार  रमेश देवकर यांनी लिंबु शरबत देउन पञकार व समाजसेवक  अशोक परदेशी  यांचे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे , पाचोरा आगाराचे  सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक जाधव, भडगाव वाहतुक नियंञक एस ए संदानशिव , शिवदास महाजन,  शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ईम्रानअली सैय्यद, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे, शिवसेना माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी, राष्टृवादी तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, निंभोरा सरपंच दिलीप पाटील, आर पी आयचे अध्यक्ष आण्णा मोरे, बोदर्डे येथील सोमनाथ पाटील, तांदुळवाडीचे शिवाजी पाटील,  ग स चे माजी संचालक सुनिल पाटील, कनाशी देव्हारीचे दिपक पाटील,  वाडे येथील जगदीश गोमलाडु, राजु गोमलाडु, शशिकांत महाजन, रविंद्र परदेशी,  एल ओ चौधरी,  भाजपाचे शुमभ सुराणा, कोठली रविंद्र पाटील, पञकार रफिक शेख, दस नंबरी,  रोहन परदेशी यांचेसह नागरीक हजर होते.
 तसेच उपोषण स्थळी भाजपा माजी  सैनिक  संघटना तालुकाध्यक्ष समाधान पाटील, माजी जि प सदस्य श्रावण लिंडायत,  प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले,  महेंद्र ततार,  निंभोरा माजी उपसरपंच विश्वास पाटील, पंग आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी, भाजपाचे शहर प्रमुख बन्सीलाल परदेशी, माजी नगर सेवक नथ्थु अहिरे, गोंडगावचे सेवानिवृत्त सैनिक विजय साळुंखे, गोंडगाव गोविंदा मांडोळे, ॅड भरत ठाकरे,  गोंडगावचे आनंदा पाटील, स्वप्नील सोनवणे, किशोर परदेशी सावदे, बांबरुड प्र ब चे रतन परदेशी, पंडीत माळी नावरे,  घुसर्डीचे रायचंद परदेशी, बोदर्डे येथील सोमनाथ पाटील, कनाशी अशोक पाटील,  ओमप्रसाद पाटील वडगाव,   वाडे डाॅ. दिवाकर पाटील,  शरद महाजन, आनंद मोरे,  प्रल्हाद मोरे, परदेशी राजपुत समाज भडगाव तालुकाध्यक्ष हरी परदेशी, गोविंद परदेशी जंगीपुरा,  जिल्हा काॅग्रेसचे सरचिटणीस याकुबखान पठाण, गोंडगावचे परमेश्वर मोरे, कजगावचे निकम,  विक्रम सोनवणे, आत्माराम पाटील निंभोरा,  निंभोरा पोलीस पाटील शरद पाटील,  दत्तु पाटील कोठली यांचेसह नागरीक , सर्वपक्षीय पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी हजर होते. यावेळी उपोषणास  सर्वपक्षीय, विविध संघटनांनी पाठींबा दिला. दि. ७ रोजी भडगाव ते वाडे बस फेरी सुरु झाली. दि. ८ पासुन काही बसफेर्या पुन्हा सुरु होणार आहेत. सायंकाळी बस वाडे मार्गाने जातांना भडगाव बसस्थानकात  पञकार अशोक परदेशी यांचे  प्रवाशांनी या बसचे , वाहक, चालकांचे आभार मानले. यावेळी वाहतुक नियंञक के डी पाटील, वाहक वाय डी सैंदाणे, चालक एन ए सोनवणे, वाडे येथील एल ओ चौधरी, यावेळी बसस्थानक प्रमुखांसह पञकार अशोक परदेशी यांनी निवेदन दिल
     भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस हया बंद फेर्या तात्काळ पुर्ववत  सुरु करण्याबाबत आगार प्रमुख पाचोरा, बसस्थानक प्रमुख ,जळगाव वाहतुक नियंञक, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे, भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पाचोरा आगार प्रमुख, भडगाव बसस्थानक वाहतुक नियंञक आदिंना भडगावचे पञकार अशोक  महादु परदेशी यांनी  दि. ३०/५/२०२२ रोजी  निवेदनाच्या प्रती  दिलेल्या   आहेत.  पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या एस टी कर्मचार्यांच्या संपामुळे सर्वञ बस फेर्या बंदच होत्या. माञ कर्मचार्यांचा संप मिटुनही भडगाव ते वाडे मार्गाच्या बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. भडगाव बसस्थानकामार्गाने लांब पल्याच्या अनेक बस फेर्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. भडगाव तालूक्यातही काही गावांना बसफेर्या सुरु झालेल्या आहेत. विदयार्थ्यांच्या शाळा, परीक्षाकाळातही भडगाव ते वाडे बंद बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याची अनेकदा मागणी करण्यात आली. तसेच दि. १०/५/२०२२ रोजी भडगाव बसस्थानक प्रमुख, पाचोरा आगारप्रमुखांकडे भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. बस फेर्या सुरु करण्याबाबत आश्वासनही देण्यात आले होते. माञ  भडगाव ते वाडे बस फेर्या पुर्ववत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. एस टी महामंडळाकडुन बस फेर्या सुरु करण्याबाबत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. प्रवाशी, विदयार्थी, नागरीकातुन नाराजी व्यक्त होत होती.   विदयार्थी, प्रवाशांना पायी प्रवास करुन ञास सहन करावा लागला. खाजगी वाहनांनी प्रवास करुन प्रवाशांना आर्थीक भुर्दड सहन करावा लागला. भडगाव ते वाडे बस फेर्या सुरु झाल्या असत्या तर एस टी महामंडळाचेही उत्पन्नात वाढ झाली असती. गाव तेथे बस सेवा हे सार्थ ठरले असते. बस सेवेअभावी प्रवाशांना वंचित राहावे लागले आहे. भडगावी तालुक्याच्या शासकीय , खाजगीकामी , बाजारपेठेत येणे नागरीकांना ये जा करणे मोठया ञासाचे ठरत आहे. शेतकरी, संजय गांधी आदि शासकीय योजनेचे अनुदान, पगार घेण्यासाठी भडगावी ये जा साठी वृद्ध गोरगरीबांना खाजगी वाहनांनी प्रवास करुन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना काळातही बस सेवा बंदच होत्या. आताही मोठा ञास सहन करावा लागत आहे. एस टी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस फेर्या पाचोरा आगारातुन सुरु केलेल्या आहेत. मग जळगाव ते वाडे बंद बस फेर्या सुरु केल्या असत्या तर प्रवाशांची प्रवासाची सोय झाली असती. एस टी महामंडळाचे उत्पन्नही वाढले असते. तरी एस टी महामंडळाने तात्काळ भडगाव ते वाडे बस फेर्या  व जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास टेकवाडे बुद्रुक, वाडे, बांबरुड प्र ब, नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, लोणपिराचे , बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नवे वढधे, जुने वढधे, भडगाव या भागातील जवळपास १८ गावातील प्रवाशी, विदयार्थ्यांची प्रवासासाठी सोय होणार आहे. जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी सुरु केल्यास  वाडेसह, भडगाव, जळगाव पर्यंत अनेक गावांची प्रवाशांची प्रवासासाठी सोय होणार आहे. तरी पाचोरा आगार प्रमुखांनी, एस टी महामंडळाने भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी बस फेरी बंद झालेली फेरी पुर्ववत सुरु करावी. सर्व बसफेर्या तात्काळ व नियमीत सुरु करण्यात याव्यात. प्रवाशांना बस सेवेचा लाभ दयावा. अन्यथा नागरीकांच्या न्याय व हक्कासाठी दि. ७/६/२०२२ वार मंगळवार पासुन भडगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रवाशी, नागरीकांसह बसण्याचा मार्ग अवलंबविण्यात येईल. व त्यास होणार्या परीणामाची आपली सर्वस्वी जबाबदारी राहील. असेही शेवटी निवेदनात म्हटले होते. या निवेदनावर भडगाव पञकार अशोक परदेशी यांची सही आहे.या निवेदनाची, मागणीची दखल पाचोरा आगाराने न घेतल्याने भडगावचे पञकार यांनी  आमरण उपोषणास बसण्याचा मार्ग अवलंबविला होता. माञ पाचोरा आगाराने दखल घेतल्याने  विदयार्थी, प्रवाशी , वृद्ध मंडळीतुन समाधान व्यक्त केले जात आहे. अशोक परदेशी यांच्या प्रयत्नांना , पाठपुराव्याला यश आल्याने समाधान मानले जात आहे.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम