गवतावर चप्पले विना चालणे खूप आहे फायदे
दै. बातमीदार । १ नोव्हेबर २०२२ आपल्या जे हवे आहे ते निसर्ग नेहमीच देंत असतोय, निसर्गात आपल्याला सगळ्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. निरोगी जीवनासाठी निसर्गाची साथ खूप महत्त्वाची आहे. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड पब्लिक हेल्थ मधील एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, आज लोक वाईट काळात जगत आहेत कारण त्यांचा पर्यावरणाशी सहसा संबंध येत नाही.
अभ्यासात असंही समोर आले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पृथ्वीच्या विद्युत उर्जेची जोड मिळाली तर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे मानसिक बदल होतात. अशाच एका संशोधनातून हेही समोर आले आहे की गवतावर चालण्याने माणसाच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात ,चला तर मग जाणून घेऊयात गवतावर चालण्याचे कोणते फायदे आहेत.
गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे
मनाला शांती मिळते
हिरव्या गवतावर पहाटे अनवाणी चालल्याने मानसिक शांती मिळते. अनेक रिपोर्ट्समधून ही बाब समोर आली आहे.
झोपेचा त्रास होणार नाही
आजच्या काळात प्रत्येक माणूस कमी झोपेचा सामना करत आहे. अशा वेळी तुम्हालाही शांत झोप घ्यायची असेल, तर आजपासूनच हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला सुरुवात करा. दररोज किमान अर्धा तास गवतावर चाला.
हृदय निरोगी राहते
रोज गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला खूप फायदा होतो. गवतावर चालल्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब संतुलित राहतो.
डोळ्यांसाठी देखील चांगले
गवतावर अनवाणी चालण्यानेही डोळे निरोगी राहतात. असं म्हणतात की गवतावर चालल्याने दृष्टी सुधारते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम