३ लाख घेऊन ‘ती’ म्हणाली- बाय! लग्नाआधीच नवरी झाली गायब, फिल्मी स्टाईलमध्ये फसवणूक!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ डिसेंबर २०२५ | अहिल्यानगरातील २९ वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची तब्बल ३ लाख रुपयांची लूट करत नवरी अर्ध्या रस्त्यातून पसार झाल्याचा प्रकार सोमवारी (१ डिसेंबर) बजाजनगर येथे उघडकीस आला. लग्न ठरल्यापासून नोटरीपर्यंत सगळा कार्यक्रम झाल्यानंतरही नवरी अचानक कारमधून उतरून दुसऱ्याच कारमध्ये बसली आणि क्षणात गायब झाली.

ओळख झाली आणि लग्नाची बोलणी सुरू झाली
वधू शोधत असताना अशोकची ओळख अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने गावाकडच्या काही मुलींचे फोटो WhatsApp वर पाठवले. त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोकने पसंत केली. मुलीचे वडील वारले असून ती आई आणि भावासोबत राहत असल्याची माहिती देऊन अरविंदने विवाहासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली.

मुलाखत, पसंती आणि कोर्टात नोटरी
३० नोव्हेंबर रोजी अशोक बांदल आणि नातेवाईक बजाजनगरातील सविता शिंदे यांच्या घरी गेले. मुलगा–मुलगी दोघांनीही एकमेकांना पसंत केले. त्यानंतर सर्वजण छत्रपती संभाजीनगर कोर्टात गेले आणि १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर विवाहाची नोटरी करण्यात आली.

पैसे दिल्यानंतर आजच मुलगी घेऊन जा

नोटरीनंतर अशोकने ठरल्याप्रमाणे ₹1,45,000 PhonePe द्वारे, ₹1,55,000 रोख, असे एकूण ३ लाख रुपये दिले. मुलीची आई म्हणाली, माया हिला आजच घेऊन जा, उद्या गावाकडे लग्न करू.

अर्ध्या रस्त्यातून नवरी गायब
माया कारमध्ये बसल्यानंतर काही अंतरावरच विना क्रमांकाची पांढरी आय-२० कार आली. त्या कारने ओव्हरटेक करून आडवे लावल्यानंतर माया खाली उतरली आणि त्या आय-२० मध्ये बसून पळून गेली. काही क्षणात कार दिसेनाशी झाली. अशोकने फोन केला तर तिचा मोबाइल बंद. घरी गेल्यावर घराला कुलूप. आई आणि नातेवाईकांचे फोनही स्विच ऑफ. तेव्हा स्पष्ट झाले — संपूर्ण कारवाई फसवणुकीचा प्लॅन होता.

पोलिस तक्रार आणि तपास
शेतकरी अशोक बांदल यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात खालील आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे:

अरविंद राठोड
गुड्डा राठोड
सविता मधुकर शिंदे
माया मधुकर शिंदे

तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम