घर घ्यायचे आहे ? अशी करा नोंदणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मे २०२३ ।  प्रत्येक परिवाराचे स्वप्न असते आपल्या हक्काचे घर असावे पण सध्याच्या परिस्थिती महागाई देशात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता गेल्या मार्चपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणीपत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही देण्यास सुरुवात झाली आहे.

नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करून दिले असून, आता १ ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे.
बिल्डर आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी विविध माध्यमातून जाहिराती करीत असतात. जाहिरातींमध्ये आता महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळासोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शविणे, बंधनकारक करण्यात आले आहे. प्रकल्पाची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

काय माहिती मिळणार?
प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प कधी नोंदविला गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुच्या, प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का… असा सर्व तपशील उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घेणे सुलभ होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम