राज्यात सावधानतेचा इशारा ; मुख्यमंत्र्यांनी बोलविली बैठक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ ।  राज्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.गिरीश महाजन, ना.दीपक केसरकर, ना.शंभूराजे देसाई, ना.दादा भुसे तसेच मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री या नात्याने मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूम येथे ना.अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सम्पन्न झाली. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.याप्रसंगी संबंधित सर्व यंत्रणांना २४ बाय ७ सतर्क राहण्याबाबत निर्देश दिले.

अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कार्यवाही तातडीनं आणि शक्यतो दिवसाच पूर्ण करावी, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसंच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात जाऊ नये तसेच पुराची परिस्थिती पाहून प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे, घाबरून जाऊ नये आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम