राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३ 

देशभरात बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात पावसाचे सावट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस काही जिल्ह्यांत जोरदार वारे, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तामिळनाडू आणि केरळमध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर तसेच कोल्हापूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यात पावसाचा अलर्ट आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम