आम्हीही सगळेच दु:खी ; शरद पवारांनी लगावला टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जानेवारी २०२३ राज्यात भाजपसह शिंदे गट विरोधात ठाकरे गट वारवार टीका करून एकमेकांमध्ये शीत युध्य सुरु आहे. त्यातच शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले दुख व्यक्त केले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले कि, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दु:खी असतील तर आम्हीही सगळेच दु:खी आहोत, महाराष्ट्रातील लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. मात्र, भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही.

शुक्रवारी राजभवनातील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दुखं आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. महाराष्ट्रातील लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावे यासाठी घेता येतील. महाराष्ट्राला अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक राज्यपाल म्हणून मिळाले. मात्र, सध्याचे भगतसिंह कोश्यारी हे राज्याचे पहिले राज्यपाल असतील ज्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण संपूर्ण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले. घटनेनुसार काम केले. मात्र, भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही. भगतसिंह कोश्यारी सतत चुकीची वक्तव्ये करत असतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे योग्य नाही. राज्यपालपद हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम