आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही ; आदित्य ठाकरेंनी सुनावले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ ।  राज्यात हिवाळी अधिवेशनात शिंदे व फडणवीस सरकारने दिशा सालियन प्रकरण उकरून काढत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी हि त्यांची भूमिका व्यक्त केली आहे.

ठाकरे म्हणाले कि, दिशा सालियानचा मृत्यू ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी रुग्णालयात होतो. आजोबा रुग्णालयात दाखल असल्यानं मी तिथेच होतो, अस आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या आरोपांवरुन आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आम्ही पट्टेरी वाघ, चौकशीला घाबरत नाही. त्यांचे पट्टे गेलेत आणि ते आता मांजर झालेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सडकून टिका केली आहे.

तुमच्यावर जे आरोप होतायत, एक डाग लागलाय, त्यामुळे रात्री झोप लागली का? या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे बोलले की, “डाग नाही, शाईला ते घाबरतात आम्ही नाही घाबरत. आम्ही पट्टेरीच वाघ आहोत. त्यांचे पट्टे गेलेत आणि ते आता मांजर झालेत. डाग नाही आमचे पट्टे आहेत, वाघाचे… ते दाखवतो. महत्त्वाची गोष्ट हिच आहे, यांचं बदनामी करण्याचं षडयंत्र आहे. त्यांची कट हाच आहे. बदनामी करायची, त्यात अर्धा दिवस बातम्या चालतील. दुपारच्या सत्रात जयंत पाटलांचं निलंबन करायचं, मग त्यावर बातम्या चालतील. यामागे एकच लपलं जाईल, ते म्हणजे, मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आणि एनआयटी. आम्ही सतत राज्यपालांनी जो छत्रपती शिवरायांचा अपमान केलाय, त्यावर बोलत राहू. मुख्यमंत्र्यांचा जो घोटाळा आहे, त्यासंदर्भात राजीनामा देईपर्यंत आम्ही बोलत राहू. त्यानंतरही कारवाई होईपर्यंत आम्ही लोकांसमोर हे सत्य आणत राहू.”
ठाकरे गटाचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, “मुखवटे फाडून आता खरे चेहरे समोर आले आहेत. मला लाज वाटतेय की, ते कधीकाळी आमच्यासोबत होते. आम्हाला लाज वाटायला लागलीये आणि खरा चेहरा समोर येतोय. बरं झालं ते तिथे गेले, त्यांचा खरा चेहरा दाखवतायत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे, ती आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रासाठी लढतेय. कालच्या सभागृहाचं चित्र पाहा, जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो, तेव्हा आमचे विषय कोणते होते? महाराष्ट्रात गुंतवणूक आणत होतो. रोजगार वाढवत होतो. कर्नाटकाच्या विरोधात बोलत होतो. ताकद आणि हिंमत महाराष्ट्राची दिसत होती. पण आता कर्नाटकावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे विषय घ्यायला तयार नाही, आम्ही जी कर्जमुक्ती केली, त्यातला एक रुपया यांनी अजून दिलेला नाही. एक गद्दार मंत्री सुप्रीया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. अद्याप पश्चाताप नाही, माफी मागितली नाही, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एक गद्दार असे आहेत, त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर गणपती मिरवणुकीत जाऊन गोळीबार केला. हे यांचं हिंदुत्व.” “परवा एक सत्ताधारी पक्षातले एक आमदार छगन भुजबळांना म्हणाले की, डोक्यावर परिणाम झालाय. त्यावर मी आवाज उठवला तर संपूर्ण सत्ताधारी पक्ष माझ्या अंगावर आला. ही कोणती पातळी झाली. एकंदरीतच संपूर्ण एकतर्फी कारभार हा सभागृहात सुरू आहे. अज्ञाय आमच्यावर सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या नागपुरात NIT चा घोटाळा झालाय, गैरवर्तन झालंय. परवापासून जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, भास्कर जाधव बोलण्याचा प्रयत्न करतायत. कुठेही आम्हाला बोलू दिलं जात नाही. शेतकऱ्यांसंदर्भात आम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय. बोलू दिलं जात नाही. मग कशाला आत जायचं?”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम