आपण संविधान मानणारे : अजित पवार
दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ आपण संविधानाला मानणारे आहोत. काही दिवसापासून काही जण गळा घोटण्याचा प्रकार करत आहेत. आपल्याकडून असे काम होणार नाही, लोकशाहीला धब्बा लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दात विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.
आद्यक्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते पवार म्हणाले, लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून रखडलेले होते. या स्मारकाचे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. राज्य सरकारने ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेहमीच चांगल्या कामाला पाठिंबा दिला. त्यामुळेच स्मारकाच्या जागेचे भूसंपादन करू शकलो. यंदाच्या दिवाळी पाडव्याला जागेच्या सीमा भिंतींचे काम केलं. स्मारकाचे काम यापूर्वीच केलं पाहिजे होते. पण आपल्या विचारांची महापालिकेत सत्ता नव्हती, त्यामुळे अडचणी आल्या. आता हे स्मारक भव्यदिव्य स्वरूपाचे झाले पाहिजे. त्यासाठी काही विधायक सूचना असतील ते लक्षात आणून द्या. महानगरपालिकेत आता प्रशासकीय राज आहे, त्यांच्या मागे लागे लागून काम करून घेतले पाहिजे, त्यामुळे चांगला कंत्राटदाराकडून या स्मारकाचे काम झालं पाहिजे. यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम