शिंदेंच्या डोक्यात उठावाची बिजे आपणच पेरली ; माजी मंत्री शिवतारेंचा गोप्यस्फोट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । राज्यात भाजप व शिवसेना २०१९ मध्ये युती असतानाच विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते असा दावाच आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

शिवतारे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी करण्याआधीच सर्व काही ठरले होते. कोणत्या जागावरील उमेदवार पाडायचे, कोणत्या उमेदवारांना विजयी करायचे हे सर्व आधीच ठरले होते. बहुमताचे आकडे कसे जुळवून आणायचे हा कट निवडणुकी आधी तयार होता, असेही शिवतारे यांनी म्हटले आहे. निवडणुकीनंतर केवळ मविआची घोषणा झाली. मात्र निवडणूक ही त्याच अनुषंगाने लढविण्यात आली होती. आता ही लोकं केवळ सर्वांना फसवत आहेत, असा दावा शिवतारेंनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की, राज्यात मविआचे सरकार आले तेव्हा हे सरकार जनतेच्या हिताचे नाही असे सर्वांत पहिले मी सांगितले.सरकार ओल तेव्हा मी नंदनवनला जात जवळपास साडेचार तास एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. त्यांना सांगतिले की हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंवर प्रेशर टाका आणि हे तोडायला लावा. राज्यात पुन्हा भाजप आणि शिवसेसेनेचे सरकार आले पाहिजे. शिंदेंच्या डोक्यात या उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा देखील विजय शिवतारे यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम