कोणत्याही सरकारने निर्णय न घेतलेले निर्णय आम्ही घेतले ; मुख्यमंत्री शिंदे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ नोव्हेबर २०२२ । राज्यातील आतापर्यत कोणत्याही सरकारने जे निर्णय घेतले नाही ते निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असं म्हटलं आहे. यावरून वाद पेटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकरी नुकसानभरापाईबाबत शिंदे म्हणाले की, आतापर्यंत जो निर्णय नुकसान भरपाई देण्याबद्दल कधीही घेतला गेला नव्हता, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला. सगळे नियम-निकष बदलले. एनडीआरएफचे नियम बाजुला केले. भरापाईसाठी निकष दोन हेक्टरचं तीन हेक्टर केले. गोगलगाईने झालेली नुकसानभरपाई दिली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस आश्वासन शिंदे यांनी दिलं.

शिंदे म्हणाले की, गावांचा समावेश कऱण्याची मागणी २०१२ ची आहे. त्या भागात पाणीटंचाई होती. आता बऱ्याच योजना केला आहे. अनेक योजना मार्गी लागत आहे. पाण्यावाचून कोणतेही गाव इकडे-तिकडे जाणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची आहे. या संदर्भात आमची बैठक झाली आहे. हा जुना वाद असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सीमावाद सामोपचाराने सोडवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. शिवाय सीमा भागातील लोकांना मिळणाऱ्या योजनांमध्ये आम्ही वाढ केली. अनेक योजना सुरू केल्या. आरोग्याच्या सुविधा सुरू केल्या. याचा या भागातील लोकांना लाभ होणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम