रामराज्यासाठी मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा हव्या !
बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका रुग्णालयातील ओपीडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना ‘राम राज्या’वर भाष्य केले. जर कोणी ‘राम राज्या’ ची कल्पना करत असेल तर त्यात सर्वांना चांगले आणि मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.
आपले सरकार याच दिशेने काम करत असल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्ली सरकारच्या अरुणा आसफ अली रुग्णालयाच्या नवीन ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) च्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना केजरीवाल यांनी आपले सरकार सर्वांना शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधादेण्यासाठी झटत असल्याचे म्हटले. आगामी दसरा आणि दिवाळीच्या संदर्भात बोलताना केजरीवाल यांनी ‘रामराज्य’ चा उल्लेख केला. आपण सगळे जण भगवान रामाची पूजा करतो. सगळीकडे रामराज्याबद्दल बोलले जाते. आम्ही ‘रामराज्य’ च्या जवळ पोहोचल्याचे मी म्हणू शकत नाही, पण आपण जर अशा राज्याची कल्पना करत असू तर त्यामध्ये सगळ्यांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा मिळल्या पाहिजेत. गरीब असो की श्रीमंत, या सुविधा सर्वांना मिळणे आवश्यक आहे. आपले सरकार याच दिशेने काम करत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम