आम्ही पुन्हा ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करू – शिंदे गटाचे मंत्री !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे गटातील अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची हाक शिंदे गटातील काही मंत्र्यांनी दिली होती पण काही अटी देखील ते टाकत आहेत पुन्हा तोच गोप्यस्फोट शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी मांडली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी कोल्हापुरात असतांना म्हणाले कि, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, पत्रकारांबरोबर बोलताना केसरकर म्हणाले, आम्हाला विकतच जायचे असते तर अडीच वर्षांत केव्हाही गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे.

दिल्लीत जेव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती दुरुस्त करू, असा शब्द दिला होता. तो त्यांनी मोडला. त्यामुळे त्यांनीच जनतेची फसवणूक केली. उद्धव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले, त्याचा दोष त्यांनी आमच्यावर काढला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम