भला मोठा हाल घालून जळगावात शरद पवारांचे स्वागत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी जळगाव दौऱ्यावर आहे. सकाळी ११ वाजता शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर अजिंठा चौफुलीवर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातर्फे जेसीबीच्या मदतीने भव्य स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर शरद पवार हे राज्यातील ठिकठिकाणी स्वाभिमानी सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. या अनुषंगाने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी खा. शरद पवार यांची जळगावातील सागर मैदानात स्वाभिमानी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर फुलांची उधळन करत फटाके फोडण्यात आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. या सभेकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले. याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अजय बढे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम