काय सांगता ! तणावापासून दूर राहणे म्हणजे ‘स्लिपिंग टुरिझम’
दै. बातमीदार । १ नोव्हेबर २०२२ नेहमीच आपण काम करीत असतांना तणावात नेहमीच जात असतोय, पण या तणावातून दूर जाण्यासाठी व्यक्ती कुठल्याही विविध गोष्टीसाठी उपाय करीत असतोय, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढलेले काम…ऑफिसमधून काम सुरू झाल्यानंतर घरी परतताना वाहतूक कोंडीमुळे होणारा मानसिक ताण…त्यामुळे होणारी चिडचिड.
या सर्वांचा थेट परिणाम आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विश्रांतवाडी येथील २८ वर्षीय अमरिंदर सिंह यांच्यावर झाला आहे. त्यामुळे हल्ली त्यांना कमी झोप येत असल्याची समस्या जाणवू लागली आहे. चांगली झोप होत नसल्यामुळे त्यांचे कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. या तणावातून बाहेर पडण्यासाठी ते पुढील आठवड्यात ‘स्लिपिंग टुरिझम’साठी रवाना होणार आहेत.
इतर क्षेत्रांसह पर्यटनातदेखील कोरोनानंतर अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे होत असलेला त्रास दूर करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात नवनवीन पॅकेज उपलब्ध होत आहेत. त्यातच आता ‘स्लिपिंग टुरिझम’चा एक नवा ट्रेंड. सुरू झाला आहे. हा ट्रेंड आहे झोपण्यासाठी केल्या जाणाऱ्या पर्यटनाचा. पाश्चात्त्य देशांमध्ये पर्यटनाचा हा प्रकार रुजलेला असून हळूहळू भारतातही याची सुरुवात होत आहे. अद्याप याबाबत बहुतांश लोकांना माहिती नसली तरी आयटी क्षेत्रात याला प्रतिसाद मिळू लागला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम