काय सांगता : मकरंद अनासपुरे अडकले लग्नबंधनात ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ ।  महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते मकरंद अनासपुरे हे नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून हसवीत असतात, आता पुन्हा एका नव्या फोटोमुळे ते चर्चेत आलेले आहे.

मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत दोन्ही कलाकार लग्नाच्या वेशात दिसत आहेत. हा फोटो समोर येताच खूप व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोनंतर आता या दोघांचं लग्न झालंय का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण आता आम्ही तुम्हाला या फोटोमागचं सत्य सांगणार आहोत.

व्हायरल हा होणारा हा फोटो तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. तेजस्विनी या फोटोसोबत अजून काही फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहील आहे की, ”वयाच्या सोळाव्या वर्षांपासुन मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनासपुरे सर , ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सहावा सिनेमा धमाकेदार चित्रपट….Stay Tuned”

त्यामुळे हा फोटो त्यांच्या आगामी सिनेमाचा आहे. ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली आहे. अभिनेत्री या विषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. या सिनेमाचं नाव काय आहे दे देखील अद्याप समजू शकलेलं नाहीये. अभिनेत्रीच्या या सिनेमासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आणि या जोडीला एकत्र पडद्यावर एकत्र पाहून चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे चाहते ही पोस्ट पाहून खूश झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीच्या या आगामी प्रोजेक्टवर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तेजस्विनी लोणारी आणि मकरंद यांनी यापूर्वी पाच चित्रपटात एकत्र काम केलं. मात्र त्यानंतर तेजस्विनी फार चित्रपटात झळकली नाही. तिने सिनेसृष्टीतून जवळपास ब्रेक घेतला होता. आता तिची आणि मकरंद यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. तिने एक पोस्ट करत त्यांचा आगामी चित्रपटातील फोटो शेअर करत या सिनेमाची घोषणा केली आहे.

तेजस्विनीची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, ‘1 सेकंदासाठी मी शॉक झालो होतो’ तर दुसऱ्याने म्हटलंय की, आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत तर अजून एकाने म्हटलंय की, अभिनंदन. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या पोस्टवर करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम