काय सांगता ! उर्फीने चक्क मच्छरदाणीच केली परिधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असलेली व विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.

 

उर्फीने आज फक्त आतले कपडे परिधान करून त्यावर अगदी पारदर्शी अशी जाळी घातली आहे. एखाद्या मच्छरदाणी प्रमाणे पातळ आणि ट्रान्सपरंट असा हा ड्रेस आहे. या ड्रेसमधून उर्फीच्या आतले कपडेही स्पष्ट दिसत आहेत. अत्यंत विचित्र स्वरूपाची अशी ही फॅशन आज तिने केली आहे. सोबतच यामध्ये तिने आपले अर्धे तोंड देखील लपवले आहे. तिचा हा अवतार पाहून सर्वांचेच डोळे फिरले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम