राजकारणात सुरु काय ? पंकजा मुंडे दोन वेळा सोनिया, राहुल गांधींना भेटल्या ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शिंदे यांच्यासह भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी पसरलेली असतांना दिसून आलेली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका वृत्ताच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी दोनवेळा दिल्ली दौरे केल्याचेही वृत्त आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक बॉम्बगोळा फुटण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे. पंकजांनी दोनवेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवलेत. पंकजा मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम