
दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ । नेहमीच आपल्या बोल्डलुकमुळे फेमस झालेली उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. जास्त दिवस उलटले नाही त्याआधी उर्फीमुळे राजकीय वाद सुरु झाला होता तो संपत नाही तोच पुन्हा एकदा उर्फीने अभिनेता रणबीरवर टीका केली आहे.
कधी गोणपाट, सेप्टिपीन, फोटो असं काहीही वापरुन उर्फीने आतापर्यंत तिचे आऊटफिट तयार केले आहेत. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत कायम तिची चर्चा होत असते. विशेष म्हणजे करीना कपूर-खानने उर्फीच्या बोल्डनेसचं कौतुक केलं. तर, दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरने उर्फीची खिल्ली उडवली. त्यावर आता उर्फीने रागाच्या भरात रणबीरला सुनावलं आहे.
काही दिवसांपूर्वीच रणबीरने उर्फीच्या फॅशनसेन्सची खिल्ली उडवली होती. उर्फी करते ती फॅशन नाहीये. मला अजिबात आवडत नाही, असं त्याने म्हटलं होतं. त्याच्या या प्रतिक्रियेवर उर्फीने आता तिचं उत्तरं दिलं आहे. एका मुलाखतीत तिने रणबीरवर निशाणा साधला आहे. “करीना कपूरने माझं कौतुक केलं यातच सगळं आलं. तिचं कौतुक ऐकून मी काही तरी साध्य केलंय असं मला वाटतं. आणि, खड्ड्यात गेला तो रणबीर कपूर. त्याची लायकी काय आहे”, असा थेट सवाल विचारत उर्फीने रणबीरप्रतीची नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणबीरने अभिनेत्री करीना कपूर-खानच्या चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये करीनाने रणबीरला उर्फीच्या फॅशनसेन्सविषय़ी प्रश्न विचारला होता. त्यावर, ”ती जी काही फॅशन करते त्याचा मी चाहता नाहीये. आज आपण अशा जगात जगतोय जिथे तुम्ही स्वत:विषयी कॉन्फिडंट असाल तर ठीक आहे. पण, तिचा फॅशनसेन्स म्हणजे बॅड टेस्ट”.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम