
सोन्यासह चांदी खरेदी करताय जाणून घ्या भाव काय ?
दै. बातमीदार । १४ मार्च २०२३ । सध्या देशात लग्नसराईचे सीजन जोरदार सुरु आहे. तर काहींचे अद्याप सोने-चांदीची खरेदी सुद्धा बाकी आहे. अशासाठी हि बातमी महत्वाची आहे. सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. जर तुमच्या कुटूंबात लग्नसराई असेल किंवा तुम्हाला सोन्या-चांदी खरेदी करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून 22 कॅरेट सोने काल (13 मार्च) 53,080 प्रति 10 ग्रॅमवर विकले जात होते. तर आज तेच सोने 53,380 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाईल. दुसरीकडे जर आपण 24 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर काल (13 मार्च) सोने 55,730 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तर तेच सोने आज 56,050 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाईल. म्हणजेच आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
bankbazaar.com च्या मते गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. दोन दिवसांपासून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच जी चांदी 68 हजार 700 रुपये किलो दराने विकली जात होती. ती आजही त्याच दराने विकली जात आहे. भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री केली जाते.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम