गाडीत पेट्रोल- डीझेल भारताय पाहून घ्या काय आहे दर ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जानेवारी २०२३ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नेहमीच चढ उतार पहायला मिळत असते. तर दोन दिवसापासून आता या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तेलाची मागणी विक्रमी पातळीवर पोहचली आहे. यापूर्वी ओपेकनेही चीनमध्ये मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली होती. पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे.

ओपेक देशांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम असा झाला की, क्रूडची विक्रमी पातळी घसरून एकावेळी 100 डॉलर्सच्या जवळपास पोहोचली. मात्र, देशांतर्गत बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (पेट्रोल-डिझेलचे दर) त्याच पातळीवर कायम आहेत. 27 जानेवारी 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.

नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम