नोटा बंद करण्याचे कारण काय ? अजित पवार आक्रमक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मे २०२३ ।  देशात नुकतीच २ हजाराची नोट कालबाह्य झाल्याने अनेक विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुद्धा पुन्हा एकदा सरकारवर ताशेरे ओढले आहे.

पवार म्हणाले कि, काय चाललंय हे…काल फतवा काढला 2 हजारची नोट बंद… यापूर्वी नोटबंदी झाली होती. मग त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या. परंतु काही वर्षात ही नोटबंदी पुन्हा आली. देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे. तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे. परंतु महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या पुन्हा त्यांना बदलण्यास जावे लागले. अन् विसरल्या म्हणजे गेले पैसे…दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? तेही केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे.

राज्यातील राजकारण कुठे गेले आहे, हा चिंतनाचा विषय आहे. राज्यात कशी भाषा वापरली जात आहे. गद्दार, 50 खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहे. खोके, गद्दार याबाबत सत्ताधारी लोकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. काही राज्यकर्ते जाणवपूर्वक बेरोजगारी महागाईवरचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात जातीय दंगली वाढत आहेत? कोणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करताय?

राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली आहे. त्याला जबाबदार कोण आहे. तुम्ही काय काय केल हे जनतेला माहीत आहे. महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले. याला काय कारण आहे. जनता सगळे दाखवून देत असते. आमच्या काळात आम्ही काय त्यांची काम बंद केली नव्हती. परंतु लक्षात ठेवा कोणी ताम्रपट घेऊन आलेले नाही. कर्नाटकच्या जनतेने हे दाखवून दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम