ही कोणती लोकशाही आहे? उद्धव ठाकरे
बातमीदार | २४ मे २०२३ | राज्यात भाजप व ठाकरे गटातील एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत या सर्व नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामध्ये आपली ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एक आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. काही लोक फक्त राजकारण करतात. मात्र, आम्ही राजकारणापलीकडे जाऊन नाते जपतो. नाते जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. यावेळी जर आपली ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधक हा गोलमाल शब्द आहे. आम्ही सर्वजण देशप्रेमी आहोत. देशातून ज्यांना लोकशाही हटवायची आहे, अशा लोकशाहीविरोधी शक्तींचा सामना करण्यासाठी आम्ही एक आलो आहोत. नुकताच सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत दिल्ली सरकारला अधिकार देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. लोकशाहीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. मात्र, केंद्र सरकारने त्याविरोधात अध्यादेश काढला. ही कोणती लोकशाही आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार आहे. लोकांनी निवडलेले प्रतिनिधी आहेत. त्यांना काही अधिकार नको का? कदाचित येत्या काळात राज्यात निवडणुकाच होणार नाहीत. फक्त केंद्रातच निवडणूक होईल आणि देशात एकच सरकार असेल. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोक्याचे आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम