शरीरावर जर पांढरा डाग होत असेल तर काय करावे ? जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात काही आजार हे बरे होतात मात्र काही आजार ते नेहमीसाठी असतातच, त्यावर कितीही उपाय केला तरी ते मुळासकट जावू शकतच नाहीत, यामधलाच एक आजार म्हणजेच शरीरावर पांढरे डाग दिसणे. यालाच व्हिटिलिगो ल्युकोडेर्मा असेही म्हणतात.

या पांढऱ्या डागांच्या संदर्भात आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की, शरीरात हा पांढरा डाग कसा होतो? हा आजार अचानक कसा झाला? या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती? पांढरे डाग पडल्यानंतर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? मला पांढरे डाग पडल्यास मी काय करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पडली असतील.

पांढर्‍या डागांबाबत लोकांच्या मनात अजूनही एक विचित्र भीती आहे. एवढेच नाही तर, अनेकजण या आजाराला कुष्ठरोग, पूर्वजन्माचे पाप आणि इतर अनेक नावांनी संबोधतात. पण हा आजार यापैकी कोणत्याही कारणांमुळे नसून तुमच्या शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होतो. तसेच, चुकीच्या खाण्यापिण्यामुळेही हा आजार वाढतो असे अनेकांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांच्या मते, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात ‘मेलेनोसाइट्स’ (Melanocytes) म्हणजेच त्वचेचा रंग बनवणाऱ्या पेशी नष्ट होतात. तेव्हा त्याला ‘ल्युकोडर्मा’ (Lyukoderma) किंवा ‘व्हिटिलिगो’ (Vitiligo) रोग होतो. हा आजार अनुवांशिकही असू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. त्वचा तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे. त्यांनाही हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. वैद्यकशास्त्रानुसार उपचार करून हा आजार बरा होऊ शकत नाही.

पांढऱ्या डागांची सुरुवातीची लक्षणं
पांढऱ्या डागांच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे त्वचेवर ठिकठिकाणी पांढरे डाग दिसणे.
सर्वप्रथम याची सुरुवात हात, पाय, चेहरा, ओठ यांपासून सुरु होते.
केस कोरडे होणे, दाढी आणि भुवया पांढरे होणे.
डोळ्यांच्या रेटिनल लेयरचा रंग मंदावणे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम