कर्मचारीना महागाई भत्ता ५० टक्के कधी होणार ? जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ । राज्यातील सरकारी कर्मचारीनी नुकतेच जुन्या पेन्शनसाठी आंदोलन केले असतात. त्यानंतर लागलीच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये यापूर्वी अनेकदा वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे जुलैमध्ये त्यात आणखी एक वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यास पगारात मोठी वाढ होणार आहे.
जुलैमध्ये डीए वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे, कारण सरकार डीए वाढवू शकते. सरकारने जानेवारीपासून महागाई भत्त्यात नुकतीच 4 टक्के वाढ केली होती, त्यामुळे महागाई भत्ता आणि दिलासा 42 टक्के आहे. त्याच वेळी, अहवालात असे म्हटले जात आहे की या भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाऊ शकते किंवा 50 टक्के केली जाऊ शकते.
सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार 50 टक्के महागाई भत्ता असेल तर तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जोडला जाईल. म्हणजे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार आहे. 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता आणि तोपर्यंत 50 टक्के डीए असेल तर तो शून्य केला जाईल असा नियम लागू करण्यात आला होता.
50% DA असेल तर पगार किती वाढेल?
केंद्र सरकारने डीए 50 टक्के केल्यास पगारात मोठी वाढ दिसून येईल. समजा एखाद्याचे मूळ वेतन 26 हजार रुपये असेल तर त्यातील 50 टक्के रक्कम 13 हजार रुपये होईल. म्हणजेच पगारात 13 हजार रुपयांची वाढ होणार असून ती मूळ वेतनाव्यतिरिक्त दिली जाणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम