हृदयासाठी आहारात कोणते तेल चांगले ? जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ ।  प्रत्येक परिवारातील एक तरी व्यक्ती आहारात तेल टाकून खात असेल पण हेच तेल खाणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जेवण बनवताना तुम्ही ते कोणत्या तेलात बनवता हे फार महत्वाचं असतं. कुकींग ऑईलची क्वालिटी योग्य नसेल तर शरीरात कोलेस्टेरॉल आणि फॅट्स वाढतात.

भारतीय जेवणात तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. प्रत्येक प्रकारचं तेल फॅट्सनी तयार होतं. तेलात जितके फॅट्स कमी असतील तितकंच हृदयाचे आरोग्य चांगले राहील. आरोग्य तज्ज्ञांच्यामते काही फॅट्सयुक्त पदार्थ तब्येतीसाठी उत्तम असतात. यात मोनोअनसॅच्युरेडेट आणि पॉलीअन्सॅच्यूरेडेट फॅट्सयुक्त तेलांचा समावेश असतो.सॅच्यूरेटेड आणि ट्रांस फॅट्सयुक्त तेल नुकसानकारक ठरते. जेवण बनवताना चांगल्या दर्जाचे आणि कमी प्रमाणात तेल वापरण्याचा प्रश्न येतो. जास्त तेलाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचे उत्पादन होते जे हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही.

हृदयरोगतज्ज्ञांच्या मते बदाम, हेजलनट, सुर्यफूल आणि रिफाईंड ऑलिव्ह ऑईल जास्त आचेवर शिजवल्यास अनेक फायदे मिळतात. कॅनोरा, द्राक्षांच्या बीयांचे तेल, ऑलिव्ह ऑईल जेवण बनवण्यासाठी आणि अन्न तळण्यासाठी उत्तम असते. तज्ज्ञांच्यामते मक्याचं तेल, भोपळ्याच्या बीयांचे तेल आणि सोयाबीन, गव्हाच्या बियांचे तेल ड्रेसिंग आणि डिप्ससाठी उत्तम आहे. जेवणासाठी याचा वापर करणं टाळायला हवं. प्रत्येक प्रकारची तेले घरात ठेवणं सोपं नाही. यासाठी अशा काही तेलांचा वापर करायला हवा जे दीर्घकाळ टिकतात. म्हणून जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढते. भारतात जास्तीत जास्त घरांमध्ये राईच्या तेलाचा किंवा तूपाचा वापर केला जातो. तूपात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. जे सूज कमी करण्यास आणि हार्ट डिसिजना रोखण्यास मदत करतात. यामुळे ब्लड प्रेशर आणि ट्राय ग्लिसराईड लेव्हल कमी करण्यास मदत होते. स्ट्रेकची धोकाही कमी होते.

तूपात आढळणाऱ्या सॅच्युरेडेट फॅट्समुळे याचे जास्त सेवन करणं टाळायला हवं. यामुळे हृदयाचे आजार वाढू शकतात. याशिवाय राईच्या तेलात सॅच्युरेडेट फॅट्स कमी आणि मोनोसॅच्युरेडेट फॅटी एसिड आणि पॉली अनसेच्युरेटेड फॅटी एसिड हाय असतात. यामुळे गुड कोलेस्ट्रेरॉल वाढवून बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
रोज योग्य प्रमाणात तेल खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की बिना तेलाचे अन्न खाणं कठीण असतं. म्हणून शक्य तितक्या कमीत कमी तेलात स्वयंपाक करा. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. महिन्याला माणशी आठशे ग्रामपेक्षा जास्त तेल खाऊ नये. फक्त घरीच नाही तर बाहेरसुद्धा पदार्थांमधील तेलाचंही मोजमाप ठेवावं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम