
मकर संक्रांत व एकादशीच्या दिवशी कोणाला लाभ, कोणाला सावधगिरी? जाणून घ्या तुमची रास
मकर संक्रांत आणि एकादशीच्या शुभ योगावर बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ हा दिवस सुरू झाला आहे. ग्रहस्थितीचा परिणाम आज अनेक राशींवर दिसून येत असून काहींसाठी दिवस लाभदायक ठरत आहे, तर काहींनी संयम आणि सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे.
मेष
आज सांसारिक बाबींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. गूढ आणि रहस्यमय विषयांमध्ये रस वाढेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र बोलताना संयम ठेवा. हितशत्रू त्रास देऊ शकतात. नवीन काम सुरू करू नये.
वृषभ
आज वैवाहिक जीवनात जवळीक वाढेल. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. सामाजिक कार्यक्रम किंवा सहलीचा योग आहे. सार्वजनिक क्षेत्रात यश आणि मान-सन्मान मिळू शकतो. व्यापाऱ्यांना प्रगती जाणवेल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशातून बातमी मिळू शकते.
मिथुन
आज अपूर्ण कामे पूर्ण होतील. अपेक्षित यश मिळेल. घरातील वातावरण शांत आणि समाधानकारक राहील. प्रकृती चांगली राहील. आर्थिक लाभ संभवतो. कार्यालयात मतभेद होऊ शकतात, सावध रहा.
कर्क
आजचा दिवस काहीसा अस्वस्थतेचा आहे. मानसिक ताण जाणवेल. अचानक खर्च वाढू शकतो. प्रेमसंबंधात वाद होण्याची शक्यता आहे. नवीन काम किंवा प्रवास टाळलेला बरा.
सिंह
आज प्रतिकूल परिस्थिती जाणवू शकते. घरात मतभेद होतील. मन अस्वस्थ राहील. नकारात्मक विचार वाढू शकतात. झोपेचा त्रास संभवतो. नोकरी व आर्थिक व्यवहारात विशेष सावधगिरी बाळगा.
कन्या
आज कोणतेही काम विचारपूर्वक केल्यास यश मिळेल. मित्र व आप्तेष्टांचा सहवास लाभेल. भावनिक नात्यांमध्ये जवळीक वाढेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. शत्रूंवर मात करता येईल.
तूळ
आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबीयांशी वाद होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येऊ शकतात.
वृश्चिक
आजचा दिवस साधारण ते चांगला आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रवास सुखद ठरतील. वैवाहिक जीवन समाधानकारक राहील.
धनु
आज रागामुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. बोलणे आणि वागणे सांभाळा. खर्च वाढू शकतो. न्यायालयीन कामकाजात सावध पावले उचला. ऊर्जा निरुपयोगी कामांत खर्च होऊ शकते.
मकर
आज विविध क्षेत्रांतून लाभ होण्याचा दिवस आहे. सामाजिक कार्यातून फायदा मिळेल. विवाह इच्छुकांसाठी चांगले संकेत आहेत. शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. खरेदीसाठी दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून लाभ संभवतो.
कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. कामे सहज पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात सकारात्मक वातावरण राहील. वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. गृहजीवन आनंदी राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
मीन
आज मनात अस्वस्थता जाणवू शकते. शारीरिक थकवा भासेल. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संततीविषयी चिंता वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम