उर्फीला कुणी मारलय ? उर्फिने व्हायरल केला फोटो !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील नेत्या विरुद्ध अभिनेत्री उर्फी जावेदच्या वादावर पडदा पडल्यानंतर पुन्हा उर्फीने सोशल मिडीयावर पोस्ट टाकून एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधते. या फोटोला उर्फीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

उर्फीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीमध्ये तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. उर्फीनं हा सेल्फी शेअर करुन कॅप्शन दिलं, ‘असं वाटत आहे की, मला कोणीतरी खूप जोरात मारलं आहे.’ उर्फीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. उर्फीनं तिचा हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी उर्फीनं एक पोस्ट शेअर करुन तिला झालेल्या एलर्जीची माहिती दिली होती. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. उर्फीनं तिच्या नो-मेकअप लूकचा फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘क्या से क्या हो गया, एलर्जीचा परिणाम. आता मी कोणासारखी दिसत आहे?’

काही दिवसांपूर्वी उर्फीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन तिनं केलेल्या आय फिलर्सबाबत सांगितलं. ती म्हणाली, ‘मझ्या डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स झाले होते. अंडर आय क्रिम हा एक स्कॅम आहे. अशी कोणतीच अंडर आय क्रिम नाहीये, जी तुमचे डार्क सर्कल्स कमी करेल. त्यासाठी आय फिलर्स हाच एक चांगला ऑप्शन आहे.’ उर्फी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याबाबत माहिती देत असते. तसेच ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम