खोके कोणी घेतले? वेळ आल्यावर दाखवू ; शिंदे गटाच्या आमदाराची टीका !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  राज्यातील ठाकरे व शिंदे गटात आता जाहीर सभा झाल्यानंतर प्रतीउत्तर देताना शिंदे गटाचे आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. गद्दारांच्या हातात भगवा शेभत नाही. हे गद्दार म्हणजे खंडोजी खोपडेची औलाद आहे. या ढेकूणांचा पराभव करण्यासाठी तोफेची गरज नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावले आहे. त्याला आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे खंडोजी खोपडे कुणाला म्हणत आहेत? वेळ आल्यावर आम्ही सर्वांना दाखवून देऊ की, गद्दारी कोणी केली? खोके कोणी घेतले? कुठे घेतले आणि कसे घेतले? उद्धव ठाकरेंना आता बोंबलू द्या. वेळ येऊ द्या, ज्याने खोके दिले त्याला आणि ज्याने घेतले त्यालाही आम्ही जनतेसमोर उभे करू. आमदार संजय शिरसाट म्हणाले, गद्दारी आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनीच केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. 2019 मध्ये आम्ही भाजपसोबत ज्या हिंदुत्वाच्या विचारांवर निवडणूक लढवली त्या विचारांचा धागा पकडून आम्ही आता काम करत आहोत. उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना आता विचारायलाही तयार नाही. सत्ता महत्त्वाची की हिंदुत्व महत्त्वाचे?, हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगावे. आम्ही भगवा वाचवण्याचे काम करत आहोत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम