बीकेसीच्या सभेचा हिशोब कोण मागणार? शिवसेनेच्या उपनेत्या अंधारेंची टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२ ईडीकडून राऊतांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्याचाही हिशोब मागितला जातो. पण मग बीकेसीमध्ये जी सभा झाली. त्यात लाखो रुपये खर्च झाले. तो गट अजून नोंदणीकृत नसतानाही एवढे पैसे कुठून आले? त्याचा हिशोब का नाही मागितला? किरीट सोमय्या त्यावर का बोलत नाहीत? प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना माफिया म्हणत होते. मग आता त्यांच्यावर एफआयआर कधी करणार?” असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर ते अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे. विरोधकांवरही त्यांनी टीका केली आहे. जामीन देताना ईडीने संजय राऊतांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं होतं. या आदेशाचा उल्लेख करत सुषमा अंधारे म्हणाल्या, “न्यायालयाने मान्य केलं आहे, राऊतांवरची कारवाई बेकायदेशीर आहे. आता यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी.

दरम्यान, किरीट सोमय्या आज रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरीत अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या संदर्भात त्यांचा हा दौरा आहे. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर टीका केली आहे आणि बीकेसीतल्या सभेचाही हिशोब मागा, अशी मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम