आयपीएलमध्ये आज कोण मारणार बाजी : पंजाब किंग्स कि कोलकाता नाईट रायडर्स ?
दै. बातमीदार । ८ मे २०२३ । देशात सुरु असलेल्या आयपीएलमध्ये आता नवचैतन्य दिसून येत आहे. आज होणाऱ्या ५३ वा सामना खेळला जाणार आहे. यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पाहायला मिळणार असून यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागून आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर आज ८ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्सला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना आगामी सामने जिंकणं गरजेचं आहे.
कोलकाता नाइट रायडर्स आयपीएल 2023 आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाताला उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. मागील सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर पाच धावांनी विजय मिळवला.
पंजाब किंग्सने आतापर्यंतच्या दहापैकी पाच सामने जिंकले आहेत. सध्या पंजाब संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मागील सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला. आगामी सामने जिंकल्यास पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघ वरचढ ठरला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्स संघाला 11 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात पंजाबने कोलकाताचा 7 धावांनी पराभव केला. पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज कोलकाता संघाला मिळणार आहे.कोलकाता आणि पंजाब यांच्यात आज 7 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम