WHO ची मोठी घोषणा : आता ‘कोरोना जागतिक महासाथ नाही,’ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  कोरोनाच्या महासाथीनं जगभरात थैमान घातलं होतं. आरोग्य संघटनेच्या वेबसाईटनुसार कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं होतं. जागतिक घड्याळाच्या काट्यावर चालणारं जग अचानक पूर्णपणे थांबलं होतं. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक महासाथ घोषित केलं होतं. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला.

आता नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठी घेषणा केल्याने सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना जागतिक महासाथ म्हणून संपल्याची घोषणा केली आहे. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणीच्या रूपात संपल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
“संघटनेच्या आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. मी त्यांचा सल्ला स्वीकारला आहे. म्हणूनच, आता मोठ्या आशेनं, मी जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याचं जाहीर करतो. पण याचा अर्थ कोरोना पूर्णपणे संपला असा होत नाही,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी म्हटलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम