अभिनेते कमल हासनांनी का बदलविले नाव ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३

देशभरात आपल्या उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायक म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन हे उत्कृष्ट अभिनेते देखील आहे. आजतागायत त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. कमल हसन याचं फिल्मी करिअर आणि राजकीय करिअर देखील नेहमीच चर्चेत असंत. अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहे.

तामिळनाडूतील परमाकुडी येथे ७ नोव्हेंबर १९५४ रोजी जन्मलेल्या कमल हासन यांनी लहानपणीच अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी ६० वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत घालवला आहे. आजही अनेक मोठे स्टार्स त्यांचे विक्रम मोडू शकलेले नाहीत. संपूर्ण जग जरी अभिनेत्याला कमल हासन या नावाने ओळखत असले तरी हे त्याचे खरे नाव नाही हे तुम्हाला नसेल. त्यांचे खरे नाव हे ‘पार्थसारथी श्रीनिवासन’ आहे. त्यांच्या वडिलांनी ‘पार्थसारथी श्रीनिवासन’ हे नाव बदलून कमल हासन केले होते. ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी किंवा पुस्तके असतात. त्या वयात कमल हसन यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या ६ व्या वर्षी कमल हसन यांनी बाल कलाकार म्हणून कलाथूर कन्नम्मा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते कमल हासन यांना सुवर्ण पदक मिळालं होतं. आजवरच्या अनेक सुपरहिट सिनेमांचा ते भाग आहेत.

कमल हासन यांनी त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये जवळपास सगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे. ते परफेक्शनिस्ट म्हणून ओळकले जातात. त्यांच्या कामात आणि लुक्समध्ये ते नेहमीच नवीन प्रयोग करताना दिसतात. ‘चाची ४२०’, ‘विश्वरुपम’, ‘इंडियन’ हे त्यांचे त्यातीलच काही सिनेमे आहेत. पण त्यांनी असा एक सिनेमा केला ज्यात तिनं एक नाही तब्बल दहा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. या सिनेमातून कमल हासन यांनी नवा रेकॉर्ड तयार केला होता. ते ६९ वर्षांचे झाले असले, तरीही त्यांचा कामाचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम