फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केले? नरेंद्र मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२४ । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर उ.बा.टा. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाबरोबरची तीन दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाराष्ट्रतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावे लागले. परंतु, जून २०२२ मध्ये राज्याचे मुक्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. सदर गटाने भाजपाशी युती करत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.

अंत्यविधीला न आल्याने खून प्रकरणातील आरोपी गजाआड

तसेच मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यतादेखील दिली. ४० आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री झाले. तर १०५ आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार संभाळत आहे. उपमुख्यमंत्रीपदी बसवून भाजपाने देवेंद्र फडणवीसांची पदावनती केल्याचे अनेकांना आवडले नाही. परंतु ही भाजपाची रणनीती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

 

पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातले सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक (१०५) जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होते की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. मात्र आम्ही तसे केले नाही. कारण आम्हाला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे होते की आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचे भले अधिक महत्त्वाचे आहे.

अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!

आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर आहे. लोकांना असे वाटतं की इतका मोठा नेता ( म्हणजेच देवेंद्र फडणवीस) एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्रीपदावर बसले आहे. फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळे केले आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम