मशालीच्या विजयातून गर्वाचे घर खाली का …?
दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये करणदादा पाटील यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले आहे. करण पाटील निवडून आणण्यासाठी कंबर कसली असून करण पाटील यांचा विजय जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी केले.
आज त्यांच्या राजगड निवासस्थानी खासदार उन्मेशदादा पाटील, उमेदवार करणदादा पाटील यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. सुरुवातीला तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांचे स्वागत केले. राजीव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन उन्मेशदादा पाटील, करणदादा पाटील यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी करण पाटील यांनी येत्या निवडणुकीत सर्वांनी विजयासाठी प्रयत्न करावे. विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त केला. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आपली निशाणी मशाल दादागिरी करणाऱ्याची लंका जाळण्याचे देखील काम करेल .
यावेळी मा.आ.राजीव दादा देशमुख,ता.अध्यक्ष दिनेश पाटील.जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे मा.नगरसेवक रामचंद्र जाधव, शहराध्यक्ष शामभाऊ देशमुख, नगरसेवक भगवान पाटील, दिपक पाटील.भुषन ब्राह्मणकर.सदाशिव गवळी जगदीश चौधरी योगेश पाटील. मार्केट कमिटी सदस्य छगन पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमूख ईश्वर ठाकरे,अमोल चौधरी.भैय्यासाहेब पाटील, अजय जाधव,सुरेश पगारे, उपाध्यक्ष गुजन मोटे.सोशल मीडिया अध्यक्ष पिनू सोनवणे.सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष सौरभ त्रिभुवन,शरद राजपूत,गौरव पाटील,चेतन वाघ,कुणाल पाटील, भुषण बोरसे, अभिजीत शितोळे,सुरज साळुंखे,प्रतीक पाटील,गोटीराम राठोड,धनजंय देशमुख,उमेश अंधोळकर,करण राजपूत, प्रविण जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार करण दादा पाटील व खासदार उन्मेशदादा पाटील यांचे जोरदार स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळील तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांच्या कार्यालयाजवळ करण्यात आले. तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी प्रास्ताविकात खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रवेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाली असून एक दमदार अभ्यासू व देशाचा टॉप टेन खासदार आम्हाला नेता मिळाल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत जिल्हा समन्वयक महेंद्र बापू पाटील, पंचायत समितीचे सभापती सुनिल पाटील, सदस्य रवीभाऊ चौधरी,विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव नाना खलाणे, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, पारोळा माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील,उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, रॉकी धामणे,भीमशक्ती शिवशक्ती सुधाकर मोरे, जेष्ठ नेते धर्मा काळे, माजी नगरसेवक बबलू बाविस्कर, तालुका महिला आघाडी प्रमुख सुविता कुमावत,सविता साळवे, किरण घोरपडे, दिनेश घोरपडे, सुरेश पाटील,सुरेश राठोड, हिरामण बोराडे, पांडुरंग बोराडे, प्रभाकर उगले,अण्णा पाटील, मनोज कुमावत,नाना मडके, विजय ठाकरे, वसीम शेख, युवराज कुमावत मेंबर, सारंग जाधव, नगरसेवक गणेश महाले, सौरव पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. शहरप्रमूख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत यांच्या जनसंपर्क कार्यालयात खासदार उन्मेशदादा पाटील, उमेदवार करणदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
आज चाळीसगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जनसंपर्क कार्यालय हिरापूर रोड येथे खासदार उन्मेशदादा पाटील, उमेदवार करणदादा पाटील यांनी भेट दिली.तालुकाध्यक्ष अनिल बापू निकम यांनी दोघांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी दंड थोपटले असून आपला हक्काचा खासदार निवडून आणू असा विश्वास दिला.
खासदार उन्मेशदादा पाटील, उमेदवार करणदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधत महाविकासा आघाडीचे उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अनिल निकम,शहराध्यक्ष रवींद्र जाधव, एम एम पाटील सर, इंजि. ए व्ही तात्या पाटील ,आर जी बापू पाटील, जेष्ठ नेते प्रदीप देशमुख, जिल्हा नेते देवेंद्रसिंग पाटील, देविदास पाटील, एड अविनाश जाधव , युवक अध्यक्ष अनमोल नानकर,नितीन परदेशी, नितीन सूर्यवंशी ,ऍड.वाडीलाल चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील ,सागर नागणे, महेश देशमुख, मधु गवळी, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर ठाकरे, भगवान रणदिवे, एड.नितीन चौधरी, समाधान राठोड, सेवा दलाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार आर डी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम