दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । हिंदू धर्माच्या विविध सणामध्ये शंख वाजून कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते, आतापर्यंत कुणालाही माहित नसेल त्या मागील काय आहे कारण. हिंदू धर्मात शंख हे विजय, समृद्धी, सुख, कीर्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वैदिक विधी आणि तांत्रिक विधींमध्येही विविध प्रकारच्या शंखांचा वापर केला जातो. आरती, धार्मिक उत्सव, हवन-क्रिया, राज्याभिषेक, गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादी शुभप्रसंगी शंखध्वनी लाभदायक मानले जाते. पितृ-तर्पणमध्येदेखील शंखाला विशेष महत्त्व आहे. देवघरात शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, म्हणून भारतीय धर्मशास्त्रात शंखाला विशेष आणि महत्त्वाचे स्थान आहे.
समुद्रमंथनातून शंखाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या 14 रत्नांपैकी शंख देखील एक आहे. विष्णु पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या आणि शंख हा त्यांचा भाऊ आहे. त्यामुळे जिथे शंख असतो, तिथे लक्ष्मीचा वास असतो, असेही मानले जाते. स्वर्गातील अष्टसिद्धी आणि नवनिधिंमध्ये शंखला महत्त्वाचे स्थान आहे. स्वतः भगवान विष्णूंनी ते हातात धरले आहे त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात शंखाचा वापर केला जातो. पूजा-अर्चा, अनुष्ठान-साधना, आरती, महायज्ञ आणि तांत्रिक कार्यांसोबतच शंखाचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक घरात शंखची स्थापना केली जाते.
शंखाचे किती प्रकार आहेत?
उजव्या हाताने जो शंख पकडला जातो त्याला दक्षिणावृत्ती शंख म्हणतात.
ज्या शंखाचे तोंड मध्यभागी उघडते तो मध्यवर्ती शंख आहे.
डाव्या हाताने जो शंख पकडला जातो त्याला वामवृत्ति शंख म्हणतात.
मध्यवृत्ति आणि दक्षिणावृत्ति शंख शिंपले सहज उपलब्ध नाहीत. त्यांच्या दुर्मिळता आणि चमत्कारिक गुणधर्मांमुळे ते अधिक मौल्यवान आहेत.
याशिवाय लक्ष्मी शंख, गोमुखी शंख, कामधेनू शंख, विष्णू शंख, देव शंख, चक्र शंख, पोंद्र शंख, सुघोष शंख, गरुड शंख, मणिपुष्प शंख, राक्षस शंख, शनि शंख, राहू शंख, केतू शंख, शेषनाग शंख, इत्यादी अनेक प्रकार आहेत.
हे आहे शंखाचे महत्त्व
असे मानले जाते की कपिला (लाल) गाईचे दूध शंखात भरून वास्तूमध्ये शिंपडल्यास वास्तुदोष दूर होतात.
असाध्य रोग आणि संकटं शंखाच्या आचमनाने दूर होतात करतात.
दुकान, कार्यालय, कारखाना इत्यादी ठिकाणी विष्णू शंख लावल्यास तेथील वास्तुदोष दूर होतात, व्यवसायात लाभ होतो.
दररोज शंखजी पूजा केल्याने लक्ष्मी घरात वास करते.
पूजेच्या ठिकाणी दक्षिणावृत्ती शंखाची स्थापना केल्याने माता लक्ष्मीचा कायमचा निवास होतो. या शंखाची स्थापना करण्यासाठी स्त्री-पुरुष शंखाची जोडी असावी.
गणेश शंखामध्ये पाणी भरून गरोदर महिलेने रोज सेवन सुधृढ बाळ जन्माला येते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम