अधून मधून उपवास करणे का आहे महत्वाचे ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ नोव्हेबर २०२२ आताच्या काळात वजन कमी करण्यासाठी काही लोक अधून मधून उपवास करीत एक धार्मिक कार्य हि होते व आपल्या आरोग्याची काळजी हि राखता येते म्हणून उपवास करत असतात, अनेक डॉक्टर आहारतज्ज्ञ आपल्या रुग्णांना आहाराचा हा नियम पाळण्याचा सल्ला देतात. ही बाब बहुतांश लोकांसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. परंतू नुकत्याच शिकागोमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार अधूनमधून उपवास करण्याच्या पद्धतीमुळे महिलांच्या हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. एव्हाना तो होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

जाणून घ्या- अधूनमधून उपवास म्हणजे काय?
अधूनमधून उपवास करणे म्हणजे ज्याला इंग्रजीत इंटरमिटेंट फास्टिंग असे संबोधले जाते. या डायटिंगची पद्धतीत 24 तासांचे 2 भाग केले जातात. या उपवासामुळे जेवणाच्या वेळेवर मर्यादा येतात. कोणीही त्यांच्या सोयीनुसार त्याचे पालन करू शकतो. ‘काय खावे’ याऐवजी ‘केव्हा’ खावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. साधारणपणे लोक दररोज 12 ते 16 तास उपवास करतात.

संशोधनात काय म्हणाले ?
अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञ लठ्ठपणाचा अभ्यास करत होते. यावेळी त्यांना अधूनमधून उपवास करण्याबाबत महिलांमध्ये होणारे बदल जाणून घेतले. रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतरच्या महिलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. हे सर्वजण लठ्ठपणाचे बळी होते. त्यांना 8 आठवडे अधूनमधून उपवास करण्यास सांगितले गेले.

प्रजनन हार्मोन्सचे प्रमाण कमी होते
संशोधनात सहभागी असलेल्यांना दररोज फक्त 4 तासांच्या आत खाण्यास दिले गेले. त्यानंतर रक्ताचा नमुना घेऊन त्यांचे हार्मोन्सची तपासणी करण्यात आली. परिणामांमध्ये असे आढळून आले की, डिहायड्रो-एपियान्ड्रो-स्टेरॉन (DHEA) चे प्रमाण 14% पर्यंत कमी झाले होते. त्यात विशेष करून महिलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढलेली दिसून आली. संशोधनात सहभागी असलेल्या क्रिस्टा वराडी यांनी सांगितले की, रजोनिवृत्तीनंतर DHEA कमी होणे ही चिंतेची बाब आहे. वास्तविक, DHEA हा इस्ट्रोजेनचा प्राथमिक घटक आहे. जो स्त्रियांमध्ये सर्वात महत्त्वाचा हार्मोन आहे. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण अचानक कमी होते. संशोधनातील महिलांमध्ये सेक्शुअल डिसफंक्शन किंवा त्वचेत कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम