लग्नात का बांधली जाते ? ; एक गाठ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जानेवारी २०२३ । प्रत्येक धर्मात लग्नाच्या विविध परंपरा आहेत तसेच हिंदू धर्मात विवाहांमध्ये अनेक विधी पाहायला मिळतात. तुम्ही पाहिलं असेल की लग्नादरम्यान वराला वधूसोबत एका गाठीने बांधले जाते. यामध्ये वराच्या खांद्यावर ठेवलेले उपवस्त्र वधूच्या उपवस्त्रासोबत एका गाठीने बांधले जाते. ही गाठ का बांधली जाते याचा कधी विचार केला आहे का? जाणून घेऊया या बद्दल काही रंजक माहिती.

हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या विधींना विशेष महत्त्व आहे. शास्त्राचे जाणकार सांगतात की, लग्नाचे हे विधी योग्य पद्धतीने पार पाडले गेले नाहीत तर वधू-वरांच्या वैवाहीक जीवनात अनेक अडथळे येतात. वधू आणि वर यांच्यात बांधलेली गाठ एक पवित्र बंधन म्हणून पाहिली जाते. वराचे उपवस्त्र आणि वधूची चुनरी यांच्यामध्ये गाठ बांधली जाते.

या गाठीला वैवाहिक चिन्ह म्हणून पाहिले जाते. ही गाठ वधू-वरांच्या शरीर आणि मनाला बांधून ठेवण्याचे प्रतीक असते. असे म्हणतात की ही गाठ जितकी मजबूत असेल तितके पती-पत्नीचे नाते अधिक मजबूत आणि प्रेमळ असते. ही गाठ बांधण्याचे काम वराची बहीण करते. ही गाठ केवळ वधू आणि वर यांच्यातील नातेच सांगते असे नाही तर ते दोन कुटुंबांना जोडण्याचेदेखील काम करते.
ही गाठ म्हणजे देवासमोर दिलेले एक प्रकारचे वचन आहे की दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ राहतील. ही गाठ त्यांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक एकतेचे प्रतीक आहे. या गाठीमध्ये नाणे, तांदूळ, दुर्वा, फुले अशा वस्तू बांधल्या जातात. म्हणजे पती-पत्नीचा संपत्ती आणि धान्यावर समान हक्क असेल. दोघेही आपल्या आयुष्यातील आनंद एकत्र उपभोगतील असा यामागचा अर्थ आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम