पुण्याच्या मनसेला मिळणार का नवसंजीवनी ; व्याख्यानाकडे राज्याचे लक्ष !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । राज्यात हिवाळी अधिवेशनात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत. पक्षाचे मेळावे, बैठका त्याचप्रमाणे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन यातून राज ठाकरे शहर ‘मनसे’ला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत.

दहा वर्षांपूर्वी राज ठाकरे हे फर्ग्युसन महाविद्यालयातील एका व्याख्यानमालेत सहभागी झाले होते. त्यानंतर ते आज सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सहकार नगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राज ठाकरे यांनी पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये पुणेकरांसाठी फक्त विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एक जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर पक्षाच्या मेळाव्यात ते बोलतच आले आहेत. मात्र जाहीर स्वरूपात ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या जाहीर सभेनंतर आज प्रथमच बोलणार आहेत. राज ठाकरे ‘नवं काही’ बोलणार की आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. पुणे महानगरपालिकेचीही निवडणूक होतीये. कधीकाळी पुण्यात प्रमुख विरोधी पक्ष असणारा मनसे आज पुण्यामध्ये संघर्ष करतोय. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा जुना जोश परत आणण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच मागील काही काळात त्यांचे पुणे दौरे वाढले आहेत. कालपासून राज ठाकरे हे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी वडारवाडी येथे दोन तर धायरी येथे एका मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील केल आहे. त्यामुळे राज ठाकरे आज पुणेकरांसमोर बोलणार असल्याने येत्या महानगरपालिकेत पक्ष कसा उतरेल यावर भाष्य करणार का ?, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम