खासदार रामदास तडस यांनी पवारामधील राजकारण रंगणार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ राज्यात सत्तेचा वाद आता नवीन राहिलेला नाही पण आता विविध संघटनेच्या व परिषदेच्या अध्यक्षतेसाठी वाढ विकोपाला जात आहे. महाराष्ट्र केसरीचा आखाडा कोण भरवणार यावरूनच आता कुस्ती संघटनांमध्ये वादाचा फड रंगला असल्याचे दिसून येत आहे. यंदा पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. यादरम्यान शरद पवार अध्यक्ष असलेली पण बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवणार असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून आता हा नवीन वाद सुरू झाला आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्यातील संघटना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे माजी पदाधिकारी यांच्यामध्येच हा वादाचा आखाडा रंगल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची कार्यकारिणी भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केली आहे. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून राज्यासाठी एका अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबत निर्णय या समितीने घेतला आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केला आहे. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव नसून सुध्दा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं ते आयोजन करतायेत अशी माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी भरवलेल्या स्पर्धेत कुस्ती पटुंनी सहभागी होऊ नये अशा आशयाचं पत्रक भारतीय कुस्ती महासंघानं काढलं आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम