राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार का ? खा. ब्रिजभूषण सिंग यांचा विरोध थंडावला

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ ।  राज ठाकरे यांना हिंदुसेवा संघचे प्रमुख मार्गदर्शक अयोध्या हनुमान गढ़ीचे प्रमुख महंत राजूदासजी महाराज आणि उदासीन अखाड़ाचे महंत धर्मदास महाराज यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांची जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशच्या मातीत पाऊल ठेवू देणार नाही. असे आव्हान देऊन राज ठाकरेंना विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांचा तीव्र विरोध थंडावताना दिसत आहे.

एकदा त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने (कदाचित खाजगी सचिव) मोबाईल घेतल्यावर काय बोलायचे आहे असा प्रश्न विचारला. या विषयावर बोलायचे आहे, आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. हा प्रश्न ऐकून त्या व्यक्तीने सांगितले की, सिंग मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही अर्ध्या तासानंतर फोन करा. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी सायंकाळी उशिरा भाजप खासदाराला दुसऱ्यांदा फोन केला असता, प्रश्न ऐकून तीन मिनिटांनी फोन करण्यास सांगण्यात आले. याशिवाय खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना मेसेज आणि व्हॉट्सऍपद्वारे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बोलणे टाळताना दिसले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम