सेहवागचा मुलगा येणार ? क्रिकेटच्या धावपट्टीवर !
दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । देशात तुम्ही पाहिले असेल कि राजकीय व्यक्तीचा मुलगा हि राजकारणातच आपली कार्य बजावीत असतो तसेच काही आता क्रिकेटच्या मैदानात होत आहे का ? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने आपली एक वेगळी ओळख बनवली. आक्रमक फलंदाजीसाठी सेहवाग ओळखला जायचा. सेहवागच्या बॅटिंगसमोर भल्या-भल्या गोलंदाजांची दिशा आणि टप्पा भरकटला. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवाग काही ऐतिहासिका इनिंग खेळला, त्याची आजही आठवण काढली जाते. सेहवाग क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर आता तो विश्लेषकाच्या भूमिकेत असतो. विरेंद्र सेहवागनंतर आता त्याचा मुलगा आर्यवीर पॅड बांधून तयार आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीरला दिल्लीच्या टीममध्ये संधी मिळाली आहे.
⭐Aaryavir Sehwag – Son of Virender Sehwag is part of Delhi Squad : U16 Vijay Merchant Trophy#CricketTwitter #India #Sehwag #VijayMerchant pic.twitter.com/44WaSVGUlq
— Indian Domestic Cricket Forum – IDCF (@IndianIdcf) December 6, 2022
आर्यवीरचा विजय मर्चेंट ट्रॉफी, अंडर-16 टुर्नामेंटसाठी दिल्लीच्या स्क्वाडमध्ये समावेश झालाय. आर्यवीरच्या बॅटिंगचा अंदाज वडिलांसारखाच आहे. सोशल मीडियावर आर्यवीरचा एक व्हिडिओ आहे. त्यात तो गोलंदाजांविरुद्ध मोठे हवाई फटके खेळताना दिसतोय. स्पिनर्सविरोधात सेहवाग आक्रमक बॅटिंग करायचा. त्याचा मुलगा सुद्धा तसाच खेळतो. विजय मर्चेंट ट्रॉफीमध्ये दिल्लीने बिहार विरुद्धच्या सामन्यात आर्यवीरला संधी दिली नाही. तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. या मॅचमध्ये दिल्लीच्या टीमने कमालीची फलंदाजी केली. ओपनर सार्थक रे ने 104 चेंडूत 128 धावा फटकावल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम