“भारत जोडो” मध्ये शिवसेना सहभागी होणार?
दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या “भारत यात्रा” सुरू आहे. दि. २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी ही यात्रा मुंबईत काढण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
ह्या यात्रेत उद्धव ठाकरे समर्थकही सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वगळून इतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले असून, शिवसेनेने मात्र या प्रस्तावाबाबत सावध पवित्रा घेतला आहे.
लवकरच ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले आहे. आता ठाकरे याविषयी काय निर्णय घेतात, यावर एकनाथ शिंदे सरकार व भाजपचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मविआचे अस्तित्व व भाजप-शिंदे गटाकडून शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तिन्ही पक्ष मिळून आगामी निवडणूक लढणार का? ठाकरे या पार्श्वभूमीवर भारत जोडो मध्ये सहभागी होतील का? ही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम